किनवट : नगर परिषदेच्या आज (दि. १४) झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत जबरदस्त राजकीय चुरस अनुभवायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे मोहम्मद हसन म. नूर खान पठाण यांनी भाजपचे श्रीनिवास नेम्मानीवार यांचा निर्णायक मताने पराभव करत उपाध्यक्षपद मिळवले.निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान ११-११ मते मिळाल्याने सभागृहात तणावाचे वातावरण पसरले. अखेर नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी सुजाता येंड्रलवार यांनी आपले निर्णायक मत राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या बाजूने टाकून मोहम्मद हसन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Tags
||जिल्हा||



