पंचशील प्रतिष्ठानच्या सामूहिक बौद्ध विवाह मेळाव्यात २७ जोडपी विवाहबद्ध

 


नांदेड, दि.५ : पंचशील प्रतिष्ठान, नांदेड च्या वतीने आयोजित करण्यात आलेला चौथा सामूहिक बौद्ध मंगलपरिणय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सा. ना. भालेराव आणि सुरेश लोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात तब्बल २७ जोडपी विवाहबद्ध झाली.



   मेळाव्याचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक आर. बी. मादळे होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून अशोक येरेकर यांनी भूमिका बजावली.यावेळी प्रफुल्ल सावंत, रमेश सोनाळे, बापूराव गजभारे, मनीष कावळे, पंढरीनाथ बोकारे, इंजि. प्रशांत इंगोले, प्रभू सावंत, आशा येरेकर, अनिता इंगोले, दादासाहेब शेळके, गणपत गायकवाड, हौसाजी वारघडे, वसंत वीर, अनिलकुमार आठवले, यशवंत गच्चे, डॉ. दिलीप फुगारे, महेंद्र कावळे आणि विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी जपत अल्प खर्चात आणि बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार विवाह सोहळे पार पाडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला.मेळाव्याच्या यशस्वी





 आयोजनासाठी भरतकुमार कानिंदे, भीमराव धनजकर, भगवान धबडगे, यशवंत उबारे, गौतम कांबळे, प्रशांत ठमके, रमाबाई पाटील, सुनीता कानिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.सामूहिक विवाह सोहळ्यामुळे नवदांपत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp