नांदेड येथे ५ जून रोजी ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन; विविध मान्यवरांची उपस्थिती


नांदेड, ता. ४ : पंचशील प्रतिष्ठान, नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा – नांदेड २०२६” हा भव्य कार्यक्रम शुक्रवारी(ता. ५)  दुपारी १२.२५ वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी-मार्ट रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

   बौद्ध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती व त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून विवाह जुळवणीसाठी संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य, समता आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांवर आधारित विवाहसंस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे.
  कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. रत्नदीप गायकवाड (उपजिल्हाधिकारी, नांदेड) राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून इंजी. संघरत्न सोनसळे उपस्थित राहतील.
मेळाव्यात विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच बौद्ध विवाह विधी भंते पंय्याबोधी  महाथेरो, बौद्धाचार्य सा. ना. भालेराव आणि बौद्धाचार्य सुरेश लोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या संरक्षणाची जबाबदारी समता सैनिक दल, नांदेड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
   या ऐतिहासिक विवाह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पुरुष व महिला संयोजन समित्यांतील असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत असून, समाजातील विवाह इच्छुक युवक-युवती व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे संयोजक इंजी. भरतकुमार कानिंदे व इंजी. म
भीमराव धनजकर असून, बौद्ध विवाह मेळावा समिती, नांदेड यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील विवाह प्रक्रियेला सकारात्मक दिशा देणारा हा मेळावा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp