किनवट,दि.१६ : एआय क्रांतीच्या युगात वाढती स्पर्धा, झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि ज्ञानाधारित जगात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, यासाठी जयंती उत्सव समिती, वझरा (बु., ता. किनवट) यांच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी ‘ज्ञानसंग्राम–२०२६’ सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, स्मृ. गोविंदराव वि. पाटील नगरी, वझरा (बु.) येथे रविवारी (दि.१८) सकाळी ११ ते दुपारी १२:३० या वेळेत होईल.डोंगराळ आणि आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना, अभ्यासाची आवड आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राजमाता जिजाऊ मॉसाहेब व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा राबवली जात आहे.स्पर्धेचा तपशील:
निवडप्रक्रिया १२ जानेवारीपर्यंत खुली होती. परीक्षा शुल्क ५० रुपये. कनिष्ठ व वरिष्ठ गटांत स्पर्धा होईल. अभ्यासक्रम: चालू घडामोडी व सामान्य ज्ञान, इतिहास-भूगोल, विज्ञान-तंत्रज्ञान, भारतीय संविधान, अंकगणित-बुद्धिमत्ता चाचणी, मराठी-इंग्रजी भाषा व पर्यावरण.आकर्षक बक्षिसे:
गुणवंतांसाठी १५,१०० रुपयांपर्यंत रोख बक्षिसे व विविध क्रमांकांसाठी पारितोषिके. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल, अशी आयोजकांची अपेक्षा.मान्यवरांची उपस्थिती:
प्रशासकीय अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व ग्रामस्थ सहभागी होतील. जयंती उत्सव समिती, शालेय समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी होईल, असा संकल्प. विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शैक्षणिक चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Tags
||जिल्हा||
