जिजाऊ ते सावित्री : किनवटमध्ये वैचारिक जागृतीचा प्रेरणादायी सोहळा


किनवट : राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त “जिजाऊ ते सावित्री – वैचारिक जागर” या भव्य गायन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, ता. २४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता दुर्गा मैदान, किनवट येथे करण्यात आले आहे.

या वैचारिक पर्वात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत तसेच सिनेगीतकार प्रा. डॉ. विनायक पवार यांच्या प्रभावी काव्यजागर व प्रबोधनपर सादरीकरणातून रसिकांना वैचारिक ऊर्जा मिळणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रनिर्मितीला दिशा देणाऱ्या प्रेरक विचारांपासून ते सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता व सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतिकारी विचारांपर्यंतचा वैचारिक प्रवास या कार्यक्रमातून उलगडणार आहे.
     या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुजाता विनोद एंड्रलवार राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य शुभांगी प्रशांत ठमके उपस्थित राहतील. तर विशेष अतिथी म्हणून अॅड. मनोज आखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
    याशिवाय सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या वैचारिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन बबन वानखेडे यांनी केले असून, संयोजन शुभम शिंदे, तर निमंत्रक ए. पी. जाधव आहेत.
या वैचारिक जागराला नागरिक, युवक व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचा दीप प्रज्वलित करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp