नांदेड : आंबेडकरवादी लोक मंचाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भव्य ‘प्रबोधन महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महासभेत ‘वर्तमान राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्ष भारताचे भविष्य’ या अत्यंत महत्त्वपूर्ण व समकालीन विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अशोक वानखेडे, अॅड. जयमंगल धनराज आणि नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य व बीएसपीचे महाराष्ट्र प्रभारी तसेच मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. रविंद्र चव्हाण हे राहणार असून, पी. एस. गवळे, प्रा. देविदास मनोहरे, अॅड. एम. जी. बादलगावकर, संजय नरवाडे, चंद्रकांत भालेराव, डी. पी. गायकवाड, दीपक सावते, जे. डी. कवडे, बाबूराव कसबे, बी. बी. पवार, शिवाजी दामोदर, बापूसाहेब सावंत, महेंद्र पिंपळगावकर, शीलरत्न चावरे, किशन कसबे आदी मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
तसेच आ. प्रतापराव चिखलीकर, नंदकुमार बनसोडे, दत्ताहरी धोत्रे, बबीताताई पोटफोडे, आंबादास हनमंते, विजय कदम (बाबा) यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून भगवात गायकवाड, राहुल माचकवाड, शंकरराव एडके, भीमराव भुरे, व्यंकट इंगळे, अनिल सावते, जयपाल वाघमारे, भानुदास पवळे, प्रशिक गायकवाड, सचिन पवार, पुंडलीकराव गजभारे, भुजंग सोनकांबळे, रवी कांबळे, प्रसेनजित गायकवाड, किशोर अटकोरे, विजय थोरात, धम्मानंद गजभारे, सिद्धार्थ गायकवाड (बंटी), विजय गोडबोले आदींचा समावेश आहे.
या प्रबोधन महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारप्रबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
