Type Here to Get Search Results !

नांदेडमध्ये धम्मचक्र अनूप्रवर्तन दिनानिमित्त हजारोंचा सहभाग; महावंदनेत समतेचा संदेश

नांदेड,दि.२: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला होता. या क्रांतिकारी घटनेच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशनसमोर भव्य महावंदना समारंभाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वाजता पूजनीय भिक्खु संघाच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या उपस्थितीत शिस्तबद्ध व श्रद्धायुक्त महावंदना संपन्न झाली. सलग तिसरे वर्ष हा समारंभ सलग तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. तथागत बुद्ध, सम्राट अशोक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर श्रद्धेय भिक्खु पय्यारत्न महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिसरण व पंचशील प्रदान केले. प्रवचनातून भावनिक ऊर्जितावस्था महावंदना संपल्यानंतर भिक्खु विनयप्रिय बोधि महाथेरो यांनी धर्मांतर चळवळीमागचा डॉ. आंबेडकरांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्या काळातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभावी शब्दांत मांडला. त्यांच्या प्रवचनातील भावस्पर्शी आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले. तरुणाईचा मोठा हातभार महाविहार, बावरीनगर (दाभड) येथील भिक्खु बुद्धभूषण यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित झाला. अनेक आंबेडकरी तरुणांनी सढळ हाताने सहकार्य करत कार्यक्रमाला शिस्तबद्ध व प्रेरणादायी रूप दिले. भिक्खु संघ व मान्यवरांची उपस्थिती या वेळी पूजनीय भिक्खु विनयप्रिय बोधि महाथेरो, भिक्खु पय्यारत्न महाथेरो, भिक्खु अस्सजी थेरो, भिक्खु संघपाल, भिक्खु बुद्धभूषण, भिक्खु शिलवान, भंते संघपाल, भिक्खुणी चारूशीला आदींसह श्रामणेर संघ उपस्थित होता. शहरातील अनेक प्रतिष्ठित उपासक-उपासिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सामाजिक परिवर्तनाचा संदेश धम्मचक्र अनूप्रवर्तन दिनानिमित्त झालेला हा सोहळा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊन गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश सोनाळे, दीपक शिराढोनकर, प्रशिक गायकवाड, रोहन कहाळेकर, किरण सदावर्ते, अनिकेत लोणे, लक्ष्मण वाठोरे, जयदीप पैठणे, जय लव्हाळे, लखन जोगदंड, राजु बोडके, संजय सोनकांबळे, अमोल महिपाळे, आकाश भोरगे, जळबा सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments