दिवाणी न्यायालय, किनवट येथे अंतर्गत तक्रार समितीची स्थापना : सदस्यपदी ॲड.दिव्या पाटील -सर्पे

ॲड.दिव्या पाटील -सर्पे

किनवट,दि.२७ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी तसेच तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण व्हावे, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा २०१३ अन्वये दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर), किनवट येथे अंतर्गत तक्रार समितीची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे.

    या समितीच्या अध्यक्षपदी एस. जी. जाधव, सह दिवाणी न्यायाधीश, हदगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीचे सदस्य म्हणून  एल. वाय. मिसलवार (सहाय्यक अधीक्षक),  एस. एम. चिटमलवार (लघुलेखक) तसेच  ॲड.दिव्या पाटील - सर्पे यांचा समावेश करण्यात आला आहे.
    या समितीच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारींवर गोपनीयतेने, न्याय्य व कायदेशीर पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार असून, सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp