किनवट, दि.२९ : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक हे दि.३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या निवृत्तीनिमित्त किनवट वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी नांदेड येथे जाऊन काल(दि.२८) त्यांचा सत्कार करत भावपूर्ण निरोप दिला.
यावेळी किनवट वकील संघांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या
समारंभात न्यायव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः किनवट येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान लवकरात लवकर किनवट येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय स्थापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सुनील वेदपाठक यांनी आपल्या कार्यकाळात या न्यायालयाच्या स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.तसेच
न्यायदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्त व जनतेचा विश्वास जपण्याचे कार्य वेदपाठक यांनी सातत्याने केल्याचे मत उपस्थित वकीलांनी व्यक्त केले. त्यांच्या न्यायिक कारकिर्दीमुळे न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान झाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या निरोप समारंभास किनवट वकील संघाचे अध्यक्ष अॅड.किशोर मुनेश्वर, अॅड. डी. जी. काळे, अॅड. राहुल सोनकांबळे, अॅड. सूर्यवंशी, अॅड. पंडित घुले, अॅड. सम्राट सर्पे, अॅड. टी. आर. चव्हाण, अॅड. पंकज गावंडे, अॅड. पुरुषोत्तमवार, अॅड. सुरेश मुसळे, अॅड. सुनील शिरपुरे, अॅड. सुनील येरेकर, अॅड. विजय कदम, अॅड. अर्पित चव्हाण, अॅड. उमेश घुले यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा वकील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या वतीने सुनील वेदपाठक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags
||जिल्हा||
