Type Here to Get Search Results !

धम्मचक्र प्रवर्तन दिन रघुनाथनगर येथे साजरा

नांदेड दि.२: रघुनाथनगर तरोडा खुर्द येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सोशल वर्कर रामचंद्र देठे हे होते.प्रथमता तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त तुकाराम वाठोरे,एन.एम.कांबळे ,प्रा सुरेश गजभारे, संजय इंगळे,अनिल शेळके, गौतम पोहरे,इत्यादींची भाषणे झाली.यावेळी बापुराव शिरसे, वामनराव शेळके ,डी.जी.सुर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.संचालन कैलास धुतराज यांनी केले. *******

Post a Comment

0 Comments