किनवट : नगरपरिषद निवडणुकीसाठी आज (ता.१६) नामनिर्देशनांची मोठी गर्दी झाली. एकूण ५४ नगरसेवक आणि ४ नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवारी दाखल झाली असून निवडणुकीत चुरस वाढली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी काजी राहत तबस्सुम काजी शफीओद्दीन, मच्छेवार पुष्पा आनंद, खान जरीना साजिद आणि शेख तयमाबेगम शे. खाजामियाँ यांनी अर्ज दाखल केले. विविध प्रभागांमध्येही दोन-दोन अर्ज भरून अनेक उमेदवारांनी जोरदार उपस्थिती दाखवली आहे.
उद्या(ता.१७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस आहे.अर्ज छाननी व अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून निवडणूक वातावरणाला आता वेग आला आहे.
Tags
जिल्हा


