किनवट: नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवक पदांसाठी उमेदवारांनी प्रचाराच्या विविध आकर्षक युक्त्या वापरून शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. यंदा प्रचारात महिला प्रचारकांची संख्या लक्षणीय असल्याने 'लक्ष्मी' च्या पावलांनी गल्लोगल्ली मतदारांच्या घरापर्यंत निघणाऱ्या रॅली लक्ष वेधून घेत आहेत.
नगराध्यक्ष आणि १० प्रभागांतून २१ नगरसेवकपदांसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभागांतर्गत सर्वाधिक पसंती मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रचारकांची संख्या वाढविण्यासाठी नाना युक्त्या करणे सुरु केले आहे. तसेच अल्पावधीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याने तंत्रस्नेही कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदा नगर पालिकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांसह एकूण ८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजप, काॅंग्रेस, माकप, शिवसेना (उबाठा)वंचीत बहुजन आघाडी, एमआयएम सह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.मागच्या दोन दिवसांपासून प्रचाराला वेग आला असून गल्लोगल्ली रॅली काढणे सुरु झाले असून 'नमस्कार' करणे उमेदवारांनी सुरु केले आहे.
||'गड आला, पण सिंह गेला'ची भीती||
