नांदेड : सीटू संलग्न महाराष्ट्र राज्य घरकामगार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉ. करवंदा गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सहसचिवपदी निवड होऊन नांदेड जिल्ह्याचा लौकिक वाढला आहे. नाशिकमधील सीटू भवन, खुटवडनगर, सातपूर येथे पार पडलेल्या तिसऱ्या राज्य अधिवेशनात ही निवड एकमताने करण्यात आली.
उपरोक्त अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातून तीन प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. अधिवेशनाचे उदघाटन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष कॉ. डॉ. डी.एल. कराड यांनी केले. राज्यातील विविध भागातील पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२४ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या अधिवेशनात राज्य अध्यक्षा म्हणून कॉ. अॅड. आरमायटी इराणी तर राज्य सरचिटणीस म्हणून कॉ. किरण मोघे यांची पुन्हा एकमताने फेरनिवड झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या कॉ. करवंदा गायकवाड यांची राज्य सहसचिवपदी आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांची राज्य कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
Tags
||महाराष्ट्र||
