आदिवासी वाद्य निर्मितीकार भालेराव दडांजे यांना राज्य शासनाचा पुरस्कार


किनवट : बुधवार पेठ (ता. किनवट) येथील पारंपरिक आदिवासी वाद्य निर्मितीचे कौशल्य जतन करत असलेले स्थानिक कलाकार भालेराव नागोराव दडांजे यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

आदिवासी परंपरेतील ढोल, ताशा, नगारा तसेच अनेक पारंपरिक वाद्य निर्मितीत प्रवीण असलेल्या दडांजे यांचे कार्य ग्रामीण भागातील संस्कृती टिकवण्यात मोलाचे मानले जाते. अनेक वर्षांपासून आदिवासी लोककलेचा वारसा जतन करून ठेवत असलेल्या दडांजे यांच्या कर्तृत्वाची राज्य स्तरावर दखल घेतल्याने किनवट तालुक्यात आनंदाची लाट पसरली आहे.

या कामगिरीबद्दल लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी दडांजे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच त्यांच्या भावपूर्ण अभिनंदनपर शुभेच्छाही दिल्या. “आदिवासी संस्कृती जिवंत ठेवणारे व स्थानिक कलावंतांना प्रेरणा देणारे त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे,” असे केराम यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रा. डॉ. सुनील व्यवहारे, माजी नगराध्यक्ष  आनंद मच्छेवार, राजेंद्र केशवे,श्रीनिवास नेमानीवार,उत्तम जाधव, रमेश बद्दिवार, यशवंत कऱ्हाळे,नीलकंठ कातले, प्रकाश कुडमेथे बंटी फड,संतोष मारसकोल्हे,दत्ता भिसे,विश्वास कोल्हारीकर, बाळकृष्ण कदम,हर्षदीप कनाके यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, समाजातील मान्यवर, तसेच कलेचे जाणकार  उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दडांजे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या कारागिरीबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त केला.

राज्यातील पारंपरिक व लोककला संवर्धनाच्या चळवळीला नवे बळ देणारा हा पुरस्कार ठरेल, असा विश्वासही यांनी व्यक्त करण्यात आला.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp