पारडी येथे जनवादी महिला संघटनेची बैठक; दारूबंदी व नागरी सुविधांवर ठोस निर्णय


किनवट : दि. २१ डिसेंबर रोजी पारडी (ता. किनवट) येथे जनवादी महिला संघटना यांच्या वतीने महिलांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने दारूबंदी, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य यांसारख्या नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दारूच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे कुटुंबव्यवस्था, महिलांचे आरोग्य आणि सामाजिक शांतता धोक्यात येत असल्याचे मत उपस्थित महिलांनी व्यक्त केले. यावर दारूबंदीच्या मागणीसाठी संघटित आंदोलन उभारण्याचा आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत तक्रारी नोंदवून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी ग्रामपातळीवर पुढाकार घेण्याचे ठरले.
या बैठकीस राज्य जमसं सचिव मंडळ सदस्य कॉ. लता गायकवाड व राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिता बोनगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिलांना संघटित होऊन हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.
बैठकीस पारडी व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp