नांदेड : शीख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी ठाम मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेड शहर हे शीख धर्मियांचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे जगप्रसिद्ध समाधीस्थळ आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक नांदेडला भेट देतात. यावर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांची जयंती साजरी होत आहे.
या पार्श्वभूमीवर, गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करून भाविकांच्या धार्मिक भावना जपाव्यात, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन मराठवाडा झोन प्रभारी मनिष वैजनाथराव कावळे यांच्या वतीने सादर करण्यात आले असून, या मागणीमुळे शीख समाजासह सर्वसामान्य नागरिकांतून शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे आहे. यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेड शहर हे शीख धर्मियांचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे तख्त सचखंड श्री हजूर साहिब हे जगप्रसिद्ध समाधीस्थळ आहे. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक नांदेडला भेट देतात. यावर्षी दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी श्री गुरु गोविंद सिंग महाराज यांची जयंती साजरी होत आहे.
या पार्श्वभूमीवर, गुरु गोविंद सिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करून भाविकांच्या धार्मिक भावना जपाव्यात, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन मराठवाडा झोन प्रभारी मनिष वैजनाथराव कावळे यांच्या वतीने सादर करण्यात आले असून, या मागणीमुळे शीख समाजासह सर्वसामान्य नागरिकांतून शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे
Tags
||जिल्हा||