या उद्घाटन सोहळ्यास सामाजिक, वैद्यकीय व न्याय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक, उद्योजक मदनलाल बलदोटा, डॉ. योगेंद्र वरडकर, डॉ. शुभांगी अहंकारी, सरपंच ईश्वर आरके, एम.आय.डी.सी.चे कोठारे, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू, सुहाना मसालेचे गिरीश क्षीरसागर आणि व्यंकटेश जोशी उपस्थित होते.
नव्या रुग्णालयामुळे किनवट व परिसरातील नागरिकांना आपत्कालीन सेवा, विविध तज्ज्ञ उपचार, आधुनिक निदान सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. विशेषतः दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
हे रुग्णालय म्हणजे केवळ आरोग्यसेवेचे केंद्र नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला मानवी संवेदनांचा आरोग्यदूत ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.