ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनचे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन हैद्राबादला


नवी दिल्ली : देशातील महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या All India Democratic Women's Association (AIDWA) च्या १४ व्या अखिल भारतीय अधिवेशनाचे आयोजन हैद्राबाद येथे दि.२५ ते २८ जानेवारी  २०२६ दरम्यान करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण परिषदेत देशातील २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे ८५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

  या अधिवेशनात महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर सखोल चर्चा होणार असून, देशभरातील महिलांच्या समस्या, अधिकार, सुरक्षितता, रोजगार, शिक्षण व समानतेसाठी पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे. विविध राज्यांतील प्रतिनिधी आपापल्या भागातील अनुभव, संघर्ष व यशकथा मांडणार असून, राष्ट्रीय पातळीवरील महिला चळवळीला बळकटी देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.
लोकशाही मूल्ये, सामाजिक न्याय आणि महिलांचे सशक्तीकरण या मुद्द्यांवर ठोस धोरणे व ठराव मांडले जाण्याची अपेक्षा आहे. महिलांच्या हक्कांसाठी एकजूट व संघटित लढ्याचा संदेश देणारे हे अधिवेशन देशभरातील महिला संघटनांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp