आंबेडकरवादी मिशनचे पंचसूत्र : विद्यार्थी-तरुणांसाठी दिशादर्शक आवाहन

 


नांदेड :
समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी शिक्षण, प्रशासन, उद्योग आणि वैचारिक प्रसार या चारही आघाड्यांवर एकाचवेळी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे. विद्यार्थी व तरुणांसाठी त्यांनी “पंचसूत्र” मांडत यशस्वी आणि जबाबदार नागरिक घडवण्याचा संदेश दिला.

या पंचसूत्रांनुसार तरुणांनी जागतिक दर्जाचे व देशपातळीवरील सर्वोत्तम शिक्षण घ्यावे, शासनकर्ते व धोरणनिर्माते बनण्याचे ध्येय ठेवावे आणि जागतिक स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होऊन प्रशासनात आपली भूमिका ठळक करावी. तसेच उद्योग-व्यवसायिक बनून स्वावलंबन व रोजगारनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यासोबतच UPSC, MPSC, बँक, SSB यांसारख्या स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनण्यावर भर देत, जीवनातील किमान पाच टक्के वेळ सलग पाच वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देशभर प्रसार-प्रचार करण्यासाठी देण्याचे आवाहन करण्यात आले.
“शिक्षण हे परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. वैचारिक बांधिलकी आणि प्रशासकीय जबाबदारी यांची सांगड घातली तरच समतावादी समाज उभारता येईल,” असे दीपक कदम यांनी सांगितले.
संपर्क:
दीपक कदम – प्रमुख, आंबेडकरवादी मिशन
मो. ९२७०७६५५५१ | ९२७०८६५५५१ | ९३२६९३२०४९

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp