हैदराबाद, दि. २४ : अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) चे १४ वे राष्ट्रीय अधिवेशन २५ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत हैदराबाद येथे होत आहे. या अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आरटीसी कल्याणमंडपम येथील चंद्रकला पांडे मंचावर पार पडणार आहे.
उद्घाटन सत्रात पद्मश्री व रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या शांता सिन्हा या स्वागतपर भाषण करणार आहेत. प्रसिद्ध लेखिका व नामवंत अभिनेत्री एम. रोहिणी उद्घाटनपर भाषण करणार असून, अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान AIDWA च्या राष्ट्रीय अध्यक्षा पी. के. श्रीमती भूषविणार आहेत.
या प्रसंगी माजी खासदार व AIDWA च्या राष्ट्रीय संरक्षक वृंदा करात यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून, संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे या देखील प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महिलांच्या हक्कांसाठी, समानता व सामाजिक न्यायासाठी लढा देणाऱ्या AIDWA च्या या राष्ट्रीय अधिवेशनाकडे देशभरातील महिला कार्यकर्ते व सामाजिक चळवळींचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समितीच्या वतीने मल्लू लक्ष्मी यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Tags
राष्ट्रीय

