किनवट : बुद्ध–फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे कृतीशील समाजसेवक म्हणून प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन फुले–आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व रिपाइं मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांनी केले.
संत भगवान बाबा महाविद्यालय, बोधडी बु. (ता. किनवट) येथील प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांचा ६१ वा वाढदिवस गोकुंदा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्मृतीशेष पतिरामजी भालेराव व कमलाआई भालेराव यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. सुभाष गडलिंग यांनी त्रिशरण व पंचशील सामूहिक वंदना घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून दादाराव कयापाक व दीपकदादा ओंकार उपस्थित होते. प्राचार्य आनंद भंडारे, प्रा. बंडू भाटशंकर, देविदास मुनेश्वर, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर यांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ॲड. मिलिंद सरपे, ॲड. पंडित घुले, विनय वैरागडे, प्रा. रविकांत सरपे, प्रा. विजय खुपसे, प्रा. शिवदास बोकडे, डॉ. गजानन वानखेडे, डॉ. अर्जुन चव्हाण, बी. जी. चंदने, ॲड. टेकसिंग चव्हाण, मनोज राठोड, वाय. एम. राठोड, विष्णु मुरमुरे, डॉ. सुरेंद्र शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. अध्यक्षीय भाषणात व्यंकटराव नेम्मानिवार यांनी प्राचार्य भालेराव हे धडाडीचे व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असल्याचे नमूद करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. जनार्धन काकडे, सुनंदा पाटील-भालेराव, सुनिता इलमकार, सुमन वानखेडे, सविता चव्हाण, रेखा येरवाड, अर्चना येरवाड व कविता राठोड यांच्यासह बंधू-भगिनी व मित्रपरिवाराने केले. कार्यक्रमाची सांगता गायक मधुकर उमरे, सुनील तामगाडगे, पाटील व अनिरुद्ध वानखेडे यांच्या गीतगायनाने झाली.
Tags
||जिल्हा||


