समतेच्या विचारांची उजळणी : ‘कल्चरल’ची फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला १० व ११ जानेवारीला

पद्मश्री सुखदेव थोरात 

नांदेड : सामाजिक परिवर्तन, सांस्कृति
काॅ.किरण मोघे

क प्रबोधन आणि वैचारिक जागृतीचे सातत्यपूर्ण कार्य करणारी कल्चरल असोसिएशन, नांदेड संस्था फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे यांच्या विचारपरंपरेचा वारसा जपण्यासाठी गेली अनेक दशके सक्रिय आहे. समता, न्याय, बंधुता आणि लोकशाही मूल्यांचा जागर करणारे नाट्यसंमेलन, व्याख्यानमाला, परिसंवाद व स्मृती पुरस्कारांच्या माध्यमातून संस्थेने सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणले आहे.


याच परंपरेत फुले–शाहू–आंबेडकर–अण्णा भाऊ साठे व्याख्यानमाला येत्या शनिवार व रविवार, दि. १० व ११ जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता, कुसुम सभागृह, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या व्याख्यानमालेचे तेवीसावे वर्ष असून, समाजप्रबोधनाचा हा उत्सव दोन दिवस रंगणार आहे.
पहिल्या दिवशी उद्घाटन सी. आर. सांगलीकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुखदेव थोरात उपस्थित राहणार असून, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावर ते पहिले पुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष प्रा. दत्ता भगत, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, डॉ. गौतम कांबळे, किशोर खांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. विठ्ठल खाडे असतील.
दुसऱ्या दिवशी, रविवार दि. ११ जानेवारी रोजी प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ महिला अधिकार कार्यकर्त्या कॉम्रेड किरण मोघे “स्त्री चळवळीची वाटचाल : उपलब्धी आणि नवीन आव्हाने” या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमा नवले राहतील.
यावेळी सन २०२५ चा ‘प्राचार्य अशोक नवसागरे स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे–सोनवणे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या वैचारिक पर्वाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर व सचिव डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp