नांदेड : कल्चरल असोसिएशन, नांदेडच्या वतीने ज्येष्ठ लेखक-कार्यकर्ते कॉ. सुभाष थोरात यांच्या “विचारवंतांच्या मुलाखती” (संपादन: डॉ. श्रीधर पवार, राजीव देशपांडे) या वैचारिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पुस्तकावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेज परिसरातील मल्टी मीडिया हॉल येथे संपन्न होणार आहे.
Tags
||जिल्हा||
