लोकन्यायालयाने न्याय सुलभ; कायदेविषयक शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन


किनवट, दि. २१ : लोकन्यायालयामुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचतो आणि तडजोडीने प्रकरणे लवकर निकाली निघतात, असे अध्यक्षीय समारोप सत्रात न्यायाधीश पी. एम. माने यांनी सांगितले. 

   ते मांडवी(ता.किनवट)येथे नुकत्याच झालेल्या कायदेविषयक जनजागृती शिबिरात बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. वाघमारे यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन ॲड. राहुल सोनकांबळे यांनी केले, तर आभार ॲड. सम्राट सर्पे यांनी मानले. 

कार्यक्रमाला प्रमुख किनवट वकील संघाचे  उपाध्यक्ष ॲड. टी. आर. चव्हाण, ॲड. यू. बी. चव्हाण, ॲड. एस. डी. राठोड उपस्थित होते.ॲड. सचिन दारवंडे यांनी पोक्सो कायदा २०१२ स्पष्ट करत सांगितले की, १८ वर्षांखालील मुला-मुलींना विशेष संरक्षण आहे. संमती असली तरी शारीरिक संबंध गुन्हा ठरतो. अशा

गुन्ह्याची माहिती असूनही तक्रार न केल्यास सहा महिने कैद व दंडाची तरतूद आहे.ॲड. पी. जी. घुले यांनी पीडित नुकसानभरपाई कायद्याबाबत मार्गदर्शन केले, तर ॲड. दीपा सोनकांबळे यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याची माहिती दिली. या शिबिरामुळे नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागृती व हक्कांबाबत सजगता वाढली.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp