लातूरमध्ये माधव बागवे यांचा नागरी सत्कार; मान्यवरांची उपस्थिती


लातूर : बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरु माधव बागवे यांचा नागरी सत्कार सोहळा येत्या रविवारी (दि.५) सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्व. दगडोजीराव देशमुख सभागृह, मार्केट यार्ड, लातूर येथे पार पडणार आहे.

   या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद) हे राहणार असून, ज्येष्ठ पत्रकार  प्रा. जयदेव डोळे  हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर  जयश्रीताई सोनकांबळे, खासदार  डॉ. शिवाजीराव काळे, चेअरमन  बी. बी. ठोंबरे तसेच भारत जोडी युवा अकादमीचे अध्यक्ष  डॉ. अशोक बेलखोडे यांची उपस्थिती लाभणार आहे.
   याशिवाय प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार,  संजय बनसोडे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस), अजित शिंदे (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल),  शरद आरगडे (सरपंच, सौंदाळा) व डॉ. राम बरुरे (संचालक, बरुरे हॉस्पिटल) यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
   माधव बागवे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या नागरी सत्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन माधव बागवे नागरी सत्कार समिती, लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp