किनवट, ता. २४ : बौद्ध समाजातील विवाह सोहळे साधेपणाने व सामूहिक पद्धतीने पार पाडण्यासाठी किनवट येथे २० वा सामूहिक बौद्ध मंगल परिणय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी(ता.२४) मे रोजी बुद्धमूर्ती परिसर, समतानगर, किनवट येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. संजयजी सिरसाठ (सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव केराम (आमदार, किनवट विधानसभा मतदारसंघ) हे राहणार आहेत, तर स्वागताध्यक्ष म्हणून दीपकदादा ओंकार कार्य पाहणार आहेत.
या सामूहिक परिणय मेळाव्यात बौद्ध परंपरेनुसार अनेक वधू–वरांचे विवाह सोहळे संपन्न होणार असून समाजातील अनावश्यक खर्चाला आळा घालण्याबरोबरच सामाजिक ऐक्य व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सुरेश कावळे हे संयोजक म्हणून कार्य पाहत आहेत, तर दयाभाऊ पाटील हे आयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
या मेळाव्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट||
