
जालना : महात्मा बसवण्णा जयंतीनिमित्त महाराष्ट्र शरण साहित्य परिषद, जालना यांच्या वतीने रविवारी (दि. १९) सायंकाळी ५.३० वाजता जुना जालना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (टाऊन हॉल) येथे विशेष ‘अनुभव सभा’, व्याख्यानमाला आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाबाबत विचारवंत व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या सोहळ्यात लातूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माधव बावगे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच धाराशिव येथील लेखक व विचारवंत अर्जुन जाधव यांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
![]() |
| माधव बावगे, अध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस |
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ मधुकरप्पा लिंगायत राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून दयानंद एकघरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून शंकर अप्पा सवादे उपस्थित राहणार आहेत. यावेळी “महात्मा बसवण्णा यांची परिवर्तनवादी लिंगायत चळवळ” या विष
यावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सामाजिक समता, मानवतावाद आणि पुरोगामी विचारांवर सखोल मंथन होणार आहे.
![]() |
| प्रा.अर्जुन जाधव |
यावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून सामाजिक समता, मानवतावाद आणि पुरोगामी विचारांवर सखोल मंथन होणार आहे.
जातीयवाद, वर्णवाद, प्रांतवाद आणि धर्म-संप्रदायवादाला छेद देत मानवतावादी मूल्यांचा प्रसार करण्याचे कार्य परिषद सातत्याने करत असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हा सोहळा सर्व नागरिकांसाठी खुला असून जालना शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. बसवराज कोरे, डॉ. यशवंत सोनुने, राजेंद्र वांजुळे, सतीश खरटमल, पुरुषोत्तम सोसे आणि विनोद वीर यांनी केले आहे.
Tags
||महाराष्ट||


