या परिषदेचे उद्घाटन रिपाइं (अ) चे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे, मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलींद आवाड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पाथरीकर असतील.
‘शिव-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत मातंग समाजाचे योगदान व आजची आव्हाने’ या विषयावर विविध मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये उद्योजक संदिप उपरे, सत्यशोधक विवाह विधीकर्ते नितीन कांबळे, ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार, आर.पी.आय.चे राजु जोगदंड, भारतीय धम्म महासंघाचे भास्कर कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.
तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे युवराज पवार, लसाकम महाराष्ट्रचे नरसिंग घोडके, बीडचे लक्ष्मण गुंजाळ, सिरसाळाचे धर्मराज मिसाळ, धाराशिवचे श्रावण क्षिरसागर, तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेसाठी बाबुराव गालफाडे, मदन जोगदंड, दशरथ जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संयोजक म्हणून पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे सौजन्य अस्मिता प्रतिष्ठाण, बीड यांचे आहे.
समाजातील प्रबोधन, संघटन आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.