किनवट न्यायालय आवारात कायदे विषयक जनजागृती शिबिर; सार्वजनिक सेवा व ज्येष्ठ नागरिक हक्कांवर मार्गदर्शन


किनवट,दि. ११ : तालुका विधी सेवा समिती आणि  अभिवक्ता संघ, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय आवारात आज(दि. ११) कायदे विषयक जनजागृती शिबिराचे आयोजन  करण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम.माने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वकील संघाचे अध्यक्ष एड. किशोर मुनेश्वर हे उपस्थित होते.



   शिबिरात  विविध कायदे, सार्वजनिक सेवा सुविधा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी अॅड. दीपा सोनकांबळे यांनी नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सार्वजनिक सेवा सुविधा, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी याविषयी सविस्तर माहिती दिली.अॅड. सचिन दारवंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय सेवा-सुविधा, त्यांच्या संरक्षणासाठीचे कायदे आणि हक्क याविषयी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अॅड. सम्राट सर्पे यांनी केले.
  अध्यक्षीय समारोपपर भाषणात न्यायाधीश पी. एम. माने यांनी  कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून अशा शिबिरांमुळे नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी एड. सचिन गिम्मेकार यांनी उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सहभागींचे आभार मानले. कार्यक्रमास वकील, पक्षकार, नागरिक, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp