नांदेड, ता. ४ (बातमीदार): लेखक फारूक अहमद लिखित 'मुसलमानों का सियासी अजेंडा' या पुस्तकावर आधारित परिसंवादाचे आयोजन शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पुरणमल लाहोटी सभागृह, सायन्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक बालाजी थोटवे राहणार आहेत. तर ज्येष्ठ साम्यवादी नेत्या स्मिता गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा दै. नांदेड तहरीकचे संपादक अल्ताफ सानी हे प्रमुख भाष्यकार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास अॅड. प्रदीप नागापुरकर, उद्धव सूर्यवंशी, बालाजी ईबितदार, बालासाहेब लोणे, अब्दुल वहीद आणि अल्ताफ हुसेन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी लेखक फारूक अहमद यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली असून, ही मुलाखत प्रज्ञाधर ढवळे घेणार आहेत. पुस्तकातील विचार, मुस्लीम समाजाचे राजकीय प्रश्न, सामाजिक वास्तव आणि समकालीन राजकारण याविषयी सखोल चर्चा या परिसंवादात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम भारतीय पिछडा शोषित संघटना, सप्तरंगी साहित्य मंडळ, बीसेफ आणि लसाकम, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, साहित्य, समाजकारण आणि समकालीन घडामोडींमध्ये रस असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
||जिल्हा||
