नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या दुसऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व भीमस्मृती ज्ञान चाचणी बक्षीस वितरण


नांदेड, दि. १९ : भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरच्या पर्यटन विभागाच्या वतीने दुसऱ्या शिक्षण परिषदेचे आयोजन शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नालंदा बुद्ध विहार, भीमघाट, नांदेड येथे करण्यात आले आहे. या परिषदेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच ‘भीमस्मृती ज्ञान चाचणी-२०२६’ मधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

     “जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है” या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत बौद्ध समाजातील तरुणांसमोरील विविध आव्हानांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मा. गणपत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.
    परिषदेचा प्रमुख विषय ‘बौद्ध तरुणांपुढील आव्हाने’ हा असून, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख मा. दीपक कदम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तरचे पर्यटन उपाध्यक्ष डॉ. नागराज कांबळे राहणार आहेत. यावेळी मा. दामोधर सरकटे, मा. सुभाष नरवाडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहतील.
   प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सरचिटणीस मा. कैलास पोहरे, जिल्हा कोषाध्यक्ष मा. बळीराम कसबे, मा. जनार्दन जमदाडे, मा. ईश्वरराव जोंधळे, अॅड. गौतम कांबळे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोधर सरकटे करणार असून प्रास्ताविक अॅड. गौतम कांबळे तर आभार प्रदर्शन रमेश कोकरे करणार आहेत. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, तालुका शाखा व शहर शाखा नांदेड उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp