तबला कलाकार शुद्धोधन कदम यांना ‘मा. ना. कदम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान


नांदेड : आंबेडकरवादी मिशनच्या वतीने ज्येष्ठ तबला कलाकार शुद्धोधन कदम यांना संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ‘मा. ना. कदम जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, मधुकर गच्छे, सुनीता माधव कदम, ॲड. प्रतीक कदम तसेच निवडंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.



यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुद्धोधन कदम यांनी अनेक वर्षे तबलावादनाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्यांच्या कलासेवेचा गौरव म्हणून हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शुद्धोधन कदम यांनी आंबेडकरवादी मिशनचे आभार मानत, हा सन्मान भविष्यातही संगीतसेवा अधिक जोमाने करण्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाला संगीतप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp