नांदेड : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आंबेडकरवादी मिशन, नांदेडच्या वतीने पुणे येथील उपआयुक्त (IPS) अविनाश कुमार यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
ही माहिती दीपक कदम, प्रमुख, आंबेडकरवादी मिशन, नांदेड यांनी दिली.
हा सत्कार समारंभ दि. २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आंबेडकरवादी मिशन, सिडको, नांदेड येथे संपन्न होणार आहे.राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीपक कदम यांनी केले आहे.
Tags
||जिल्हा||