किनवट : प्राईड मंथच्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा सहभाग विभागातर्फे 'सतरंगी गप्पा' या विशेष ऑनलाईन संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी(ता. ३०) सायंकाळी ८ वाजता गुगल मीटद्वारे होणार आहे.
या संवादामध्ये लैंगिकता, लिंगभाव, विविधता, समता आणि स्वीकार या विषयांवर मनमोकळी चर्चा होणार असून, समाजात समावेशकता आणि संवेदनशीलता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
"विविधतेचा स्वीकार, समतेचा आधार आणि प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वाचा सन्मान" हा संदेश देत समाजात परस्पर आदर, समानता आणि मानवतेची मूल्ये रुजविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा सहभाग विभागाने विद्यार्थी, युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते तसेच इच्छुक नागरिकांनी या ऑनलाईन संवादात सहभागी व्हावे असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा किनवटचे कार्यवाह उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांच्यासह प्रा. डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. वसंत राठोड यांनी केले आहे.
Tags
||महाराष्ट||