किनवटच्या लोकअदालतीत १५० प्रकरणे निकाली : ७८ लाखांहून अधिक रक्कम वसुल
September 16, 2025
0
किनवट,दि.१६ : राष्ट्रीय विधी सेवा, राज्य विधी सेवा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार शनिवारी(दि.१३) दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,किनवट आणि तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालत  घेण्यात आली. या अदालतीत तडजोडीनंतर एकूण १५० प्रकरणे निकाली काढण्यात आलीत.यामध्ये ७८ लाखांहून  अधिक  रक्कम वसुल झाली.
   लोकअदालतीमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी.एम.माने यांनी पॅनल प्रमुख म्हणून पदभार सांभाळला.त्यांना सह दिवाणी न्यायाधीश के.जी.मेंढे यांनी  सहकार्य केले.पॅनल सदस्य म्हणून ॲड. दिव्या पाटील- सर्पे यांनी कामकाज पाहिले. लोकअदालतीसमोर दिवाणी प्रकरणांपैकी व  फौजदारी प्रकरणांपैकी ७८ लाख १५ हजार २०० रुपये लोकअदालतीला मिळाले.
    या लोकअदालतीला अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर, उपाध्यक्ष ॲड.टेकसिंग चव्हाण, सहसचिव ॲड.मुसळे, कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे , ग्रंथपाल ॲड.  कानिंदे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ वकील उपस्थित होते.यशस्वीतेसाठी न्यायालयीन सहाय्यक अधिक्षक डी.एस.पदरे,शेख मुजाहीद,एस.व्ही.चटलेवार,एफ.बी.निलवर्ण, के.व्ही.पवार व पोलिस  कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Post a Comment
0 Comments