Type Here to Get Search Results !

नांदेडमध्ये “देवानपिय असोका” नाटकाचा शानदार उद्घाटन सोहळा : ऐतिहासिक नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांची दाद

नांदेड
मध्ये “देवानपिय असोका” नाटकाचा शानदार उद्घाटन सोहळा : ऐतिहासिक नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांची दाद नांदेड, दि. १५ : नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात ऐतिहासिक भव्य नाटक “देवानपिय असोका” चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश शिंगे यांनी केले होते, तर नाटकाची निर्मिती मुंबई येथील बोधिवृक्ष फाउंडेशन द्वारा करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सुरुवात झाली. या वेळी बौद्ध धम्मगुरु भंते पय्याबोधी थेरो, भंते शीलरत्नजी थेरो आणि त्यांचा श्रामणेर संघ यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीला सह धम्मदेशना दिली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने कार्यक्रमाला आध्यात्मिक आणि बौद्धिक अधिष्ठान प्राप्त झाले. कार्यक्रमाला प्रफुल्ल सावंत (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग), नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, माजी महापौरांचे प्रतिनिधी किशोर भवरे, इंजि. प्रशांत इंगोले (माजी जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी), सुभाष काटकांबळे, सुरेश हटकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर “देवानपिय असोका” या ऐतिहासिक नाटकाचा सर्व प्रेक्षकांनी लाभ घेतला. नाटकातील सादरीकरण, विषयाची सखोलता आणि ऐतिहासिक संदर्भ यांना नांदेड येथील बुद्धिजीवी प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम नांदेडमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणिवा जागृत करणारा ठरला असून, अशा उपक्रमांनी समाजात इतिहासाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments