Type Here to Get Search Results !

शिक्षणक्रांती व बंधुत्वासाठी नांदेडमध्ये राज्यस्तरीय परिषद आंबेडकरवादी मिशनतर्फे मुस्लीम शिक्षणक्रांती अभियानाचे आयोजन

नांदेड : समाजात शिक्षणक्रांती घडविणे आणि मुस्लीम समाजाबरोबर बंधुत्व, भाईचारा तसेच सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आंबेडकरवादी मिशन तर्फे “मुस्लीम शिक्षणक्रांती परिषद व राज्य अभियान” आयोजित करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर चौक (लातूर कॉर्नर), सिडको, नांदेड येथे होणार आहे. या परिषदेत समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, देश-विदेशातील शैक्षणिक संधी आणि UPSC/MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिक्षणक्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक रणनितीवर मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून निवडक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना NEXT IAS च्या बॅचमध्ये निःशुल्क प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक मा. अविनाश कुमार (IPS) यांच्यासह खासदार रविंद्र चव्हाण, फारूख अहमद, अब्दुल सत्तार, सय्यद मोईन, डॉ.प्रो. एम.ए. बशीर, डॉ. निहाल अहमद खान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड. अल्ताफ अहमद, प्रो. एम. के. सय्यद, शेख सादिक, कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवासंघ), एकनाथ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच डॉ. यशवंत चव्हाण, आनंद चव्हाण, नंदन नांगरे (माजी शिक्षण संचालक), दिगंबर मोरे, प्रा. भास्कर दवणे, भगवानराव धबडगे (PI, राष्ट्रपती पुरस्कार), विठ्ठल गायकवाड, प्रसेनजित वाघमारे, गणेश सोंडारे (PI), गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, इंजि. शिवाजी सोनकांबळे, इंजि. प्रकाश नगारे, देविदास रंगदळ व संघमित्रा सोनकांबळे यांनी समाजातील युवक-युवती, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments