लातूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानोबा जरीपटके
September 22, 2025
0
लातूर,दि.२२ : महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसीन दुकानदार महामंडळाच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानोबा जरीपटके यांची निवड करण्यात आली.आज(दि.२२) संघटनेचे  छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष देवानंद सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणी निवड सभेत ही निवड एकमताने जाहीर करण्यात आली.
या बैठकीस संघटनेचे नांदेड जिल्हा  कार्याध्यक्ष अशोक कापशीकर, अरुण कांबळे, दादाराव उत्तरे, नाना पाटील शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल अलमले, माधव भंडारे, बब्रुवान केसाळे, सुरेश कांबळे, इकबाल पठाण, बंडू खांडेकर, नानासाहेब दमशेठे, बंडू निवृत्ती कांबळे, ए. पी. गडदे यांसह इतर सदस्यांचीही कार्यकारिणीत निवड करण्यात आली.या निवड सभेस लातूर जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment
0 Comments