१ आक्टोबर रोजी बसपाचे नांदेडला तीव्र धरणे आंदोलन

नांदेड दि.२९ : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावात तसेच नांदेड शहरात मालमत्ता आणि जीवीत नुकसान झाले. पण, अद्यापही आर्थिक मदत वाटप करण्याची दखल मुद्दामहून शासन प्रशासनाने घेतली नाही, यामुळे १ आक्टोबर गुरूवारी सकाळी ११ वाजता पासून दिवसभर बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पावसामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले.कुटूंबे उघड्यावर पडली.घराघरात पाणी शिरले.साहित्य वाहून गेले, व्यक्ती दगावल्या .जनावरे मृत्युमुखी पडली.शेतीचे अतोनात नुकसान झाले. एवढी मोठी आपत्ती येऊनही शासनाकडून गतवर्षी आणि याही वर्षी नुकसानीची कसलीही मदत दिली नाही. यासाठी हे धरणे आंदोलन असल्याचे प्रसिध्दी पत्रकात जिल्हाध्यक्ष डाकोरे यानी नमूद केले आहे. ज्या कुटूंबाचे सांसारिक नुकसान झाले त्यांना एक लाख रुपये मदत द्यावी,पावसाने मृत झालेल्या व्यक्तिच्या वारसांना एक लाख रुपये मदत द्यावी ,मृत कुटूंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी खरडून गेल्या त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये द्यावेत,जणावरे दगावली अशा पशुपालकांना नवीन जनावरे द्यावीत, अशा मागण्या या तीव्र धरणे आंदोलनात करण्यात येणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, विक्की वाघमारे, कमलेश चौदंते,अर्जून नरवाडे, लक्ष्मण वायवळे,दिलीप देशमुख,शेख सलीम, महिला आघाडी अध्यक्षा दिपमाला कांबळे तसेच श्रीकांत नगणीकर, माधव कंधारे,महासचिव अविनाश इटकापल्ले, साहेबराव थोरात, जिल्हा सचिव माधव कांबळे, मिलिंद धावारे, संतोष सरोदे, भीमराव जाधव,झुंबर लोणे, विजय गच्चे,सुरेश जोंधळे, राजकुमार पैठणे, भीमराव पाटील,डॉ.कैलास कानिंदे,मनोहर डुमने,धम्मपाल गच्चे,जय पंडित, सुनील कांबळे,दलित कांबळे, नारायण कांबळे,प्रदिप कसबे, नारायण घुले आदी बसपा पदाधिका-यानी केले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp