भीमशक्ती मराठवाडा विभागीय परिषदेत सामाजिक बदलासाठी संघटित लढ्याचा निर्धार
September 28, 2025
0
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील कॅम्ब्रिज चौकाजवळील नंदनवन हॉटेलमध्ये आज भीमशक्ती मराठवाडा विभागीय परिषदेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच पार पडले. या परिषदेत भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार  चंद्रकांत हंडोरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या वेळी प्रदेश उपाध्यक्ष  दिनकर ओंकार, मुंबई प्रदेशाध्यक्ष शशिकांत बनसोडे, प्रदेश सरचिटणीस मोहन माने, प्रदेश सचिव  विजय सुखदेव, सचिन सिरसाट, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोष भिंगारे, आनंद तायडे, युवा आघाडी अध्यक्ष प्रेम चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजु मंजुळे, विनोद कोरके तसेच मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.परिषदेतील चर्चेत संघटना विस्तार, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, कार्यपद्धती आणि जनसंपर्क मोहीम या विषयांवर सविस्तर संवाद झाला. आपल्या मार्गदर्शनात हंडोरे यांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने संघटित आणि सातत्यपूर्णपणे काम करण्याचा संदेश देत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.संपूर्ण परिषदेभर कार्यकर्त्यांचा उत्साह, ऐक्य आणि संकल्प यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
Tags

Post a Comment
0 Comments