नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, थोर अर्थतज्ज्ञ व दूरदृष्टीचे नेते स्वर्गीय डॉ. मनमोहनसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज एक ऐतिहासिक क्षण घडला. देशाच्या आर्थिक धोरणांना नवी दिशा देणाऱ्या आणि लोकशाहीला बळकटी देणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या मनमोहनसिंग संशोधन केंद्र व ग्रंथालयाचे भव्य उद्घाटन आज राजधानी दिल्ली येथे संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह डॉ. मनमोहनसिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या उपस्थितीने ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
या संशोधन केंद्र व ग्रंथालयामुळे देशाच्या अर्थकारणात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आणि लोकशाही बळकटीकरणासाठी कार्य करणाऱ्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या विचारांना नव्या पिढीला जाणून घेण्यासाठी व अभ्यासासाठी प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
Tags
देश-विदेश
