खाजगीकरणाला विरोध — विज कर्मचारी व अभियंते कृती समितीचे ठिय्या आंदोलन; राज्यव्यापी संपाचा इशारा

भोकरदि.६ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रिस्टक्चरिंग व खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात विज कर्मचारी अभियंते कृती समितीच्या वतीने भोकर विभागातील कार्यकारी अभियंता यांच्या दालनात सोमवारी (दि.६) ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटना, कामगार महासंघ, वर्कर्स फेडरेशन, एस.ई.ए., इंटक, स्वाभिमानी वर्कर्स युनियन, तसेच तांत्रिक कामगार संघटनेचे अभियंते,अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान वक्त्यांनी प्रशासनाच्या रिस्टक्चरिंगच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवित, विज कंपनीचे खाजगीकरण म्हणजे जनतेच्या हितावर घाला असल्याचे सांगितले. शासन व प्रशासनाने अन्यायकारक धोरणे त्वरित मागे घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कृती समितीने इशारा दिला आहे की, जर शासनाने आपली भूमिका न बदलल्यास आगामी दि. ९, १० व ११ ऑक्टोबर रोजी राज्यभर ७२ तासांचा संप पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे वीज विभागातील असंतोष अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp