महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १४ ऑक्टोबरला मुंबईत विराट मोर्चा : रामदास आठवले
October 06, 2025
0
मुंबई, दि. ६ : बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च श्रध्दास्थान बौद्धांच्या ताब्यात यावे, या मागणीसाठी येत्या १४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या शांततापूर्ण मोर्चात सर्व गट-तट विसरून बौद्ध समाजाने एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
बांद्रा येथे धम्मरथाचे उद्घाटन करताना ते म्हणाले, “महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये सर्व ९ सदस्य आणि चेअरमन बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. बौद्ध समाजाने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी.”
१४ ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने या दिवशी आयोजित मोर्चा बौद्ध एकतेचे प्रतीक ठरणार आहे. हा मोर्चा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध संघटना व नेते यात सहभागी होणार आहेत.

Post a Comment
0 Comments