मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा किनवट अभिवक्ता संघाकडून तीव्र निषेध

किनवट,दि.७ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा अभिवक्ता संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या निषेधार्थ न्यायालयातील वकीलांनी आज (ता.७) न्यायालयीन कामकाजात सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अभिवक्ता संघाच्या वतीने दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात सर्वोच्च न्यायालयातील आदरणीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर ॲड. राकेश यांनी वस्तू फेकून केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, “न्यायदान ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असून न्यायसंस्थेचा सन्मान हा लोकशाहीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक आहे. न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारे अपमानास्पद वर्तन करणा-या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी संघाने केली आहे. या प्रसंगी अभिवक्ता संघाच्या तातडीच्या बैठकीत हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. वकील संघाने सर्व न्यायिक अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, आजच्या दिवशी कोणत्याही प्रकरणात अॅडव्हर्स ऑर्डर (Adverse Order) देऊ नये आणि संघाच्या ठरावास सहकार्य करावे. या निवेदनावर अध्यक्ष अॅड. किशोर के. मुनेश्वर, उपाध्यक्ष अॅड. टेकसिंग आर. चव्हाण, सचिव अॅड. माज. एस. बडगुजर, सहसचिव अॅड. एस. के. मुसळे, कोषाध्यक्ष अॅड. सम्राट एम. सर्पे, आणि ग्रंथपाल अॅड. विशाल बी. कानिदे यांच्यासह सर्वच जेष्ठ व कनिष्ठ वकीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. -----------------------------------------------------
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp