नांदेड,दि.२१: येथून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या खुरगाव-नांदुसा येथील श्रवणेर प्रशिक्षण केंद्रात दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी केंद्राचे प्रमुख भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या कठीण चीवरदानाचा भव्य सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात थायलंडसह देशातील विविध भागांतून आलेल्या भिक्खूसंघाने सहभाग घेतला. अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आयु. सी. एल. थूल व संबोधी अकादमी महाराष्ट्रचे आयु. डॉ. भीमराव हत्तीअंबिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान समता सैनिक दलाचे मेजर जनरल सुरेश गजभारे व त्यांच्या सैनिकांनी उत्कृष्ट सेवा बजावत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक देखणेपणा प्राप्त झाला.
Post a Comment
0 Comments