नांदेड, ता. २१ : श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव, नांदुसा, नांदेडचे संस्थापक अध्यक्ष व नांदेड जिल्हा भिखु संघाचे जिल्हाध्यक्ष पुज्य भंते पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ६० बौद्ध उपासक व उपासीका यांचा अभ्यासदौरा थायलंड येथे आयोजित करण्यात आला आहे. आज मंगळवारी(दि.२१) हा बौद्ध अभ्यासदौरा नांदेड येथील हुजूर साहेब रेल्वे स्टेशनवरून भव्य उत्साहात रवाना झाला.
या वेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर शिला किशोर भवरे, माता रमाई आंबेडकर बौद्ध विहार सहयोग नगर महिला मंडळाच्या अध्यक्षा जया सूर्यवंशी, पुष्पा भरणे, कदमताई, सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग तारु यांनी उपस्थित राहून उपासक-उपासिकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास रिपब्लिकन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा सोनाळे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी अशोकदादा गोडबोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. बाळासाहेब सोनकांबळे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस सुभाष काटकांबळे, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोनकांबळे, सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाचे भगवान गायकवाड, एस.एन. गोडबोले, सेवानिवृत्त उपप्राचार्य इंगोले , सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
थायलंडमधील बौद्ध धर्मसंस्कृती, ध्यान साधना, व शिक्षणपद्धती यांचा अभ्यास करून उपासक-उपासिका आत्मविकासाच्या मार्गावर प्रेरणा घेतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.





