मुंबई : राज्यातील रास्त भाव दुकानदारांना सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंतचे प्रलंबित मार्जिन दिवाळी सणापूर्वी अदा करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहेत. याबाबतची प्रक्रिया त्वरित सुरू करून कार्यवाहीचा सविस्तर अहवाल शासनास सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
या संदर्भातील आदेश विभागाचे कक्ष अधिकारी नितीन गणेश सोनखासकर यांनी जारी केले असून, सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी व उप नियंत्रकांना कार्यवाहीचे निर्देश पाठविण्यात आले आहेत.
Tags
जिल्हा