Type Here to Get Search Results !

मुस्लिम शिक्षणक्रांती परिषदेच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश आंबेडकरवादी मिशनचा उपक्रम उत्साहात पार पडला

नांदेड दि.५ : मुस्लिम समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजजागृतीचा संदेश देण्यासाठी "मुस्लिम शिक्षणक्रांती परिषद" हा उपक्रम आंबेडकरवादी मिशनच्या वतीने आज(दि.५) उत्साहात संपन्न झाला.आंबेडकरी मिशनचे प्रमुख दीपक कदम हे संयोजक असलेल्या या परिषदेला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अबीनाश कुमार (आयपीएस, जिल्हा पोलिस अधीक्षक) हे उपस्थित होते. यावेळी कामाजी पवार (राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ), एकनाथ मोरे, डॉ. यशवंत चव्हाण, दिगंबर मोरे, ॲड. शिवाजी कोळीकर, इंजी. बनसोडे, भगवान धाबडगे, गणेश सोंदरे, कांबळे, शेख समदानी, प्रसेनजीत वाघमारे, विठ्ठल गायकवाड, प्रा. डॉ. एम. ए. बशीर, आशिफ नदवी साहेब, अबरार देशमुख, मिर्झा बेग, अब्दुल कादिर, मोहम्मद अराफत, शेख अल्ताफ अहमद, प्रा. डॉ. झीशान अली, मिर्झ बेग, एस. एम. शमीम, फारुख अहमद, शकिला बानो शेख, आमिर सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात वक्त्यांनी शिक्षण हीच खरी क्रांती असल्याचे सांगत मुस्लिम समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले. आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून ज्ञान, समानता आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला. उपस्थित श्रोत्यांनीही "शिक्षण हीच खरी क्रांती" असा नारा देत परिषदेचा उद्देश साध्य केल्याची भावना व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments