Type Here to Get Search Results !

ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये ५० हजार मदत द्या : नांदेड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी रुपये ५० हजार मदत देण्यात यावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनात खासदार प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. अ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, प्रदेश सरचिटणीस प्रा. यशपाल भिंगे, सुरेंद्र घोडजकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, डॉ. रेखा चव्हाण, डॉ. दिनेश निखाते, धनराज राठोड, कार्याध्यक्ष तिरुपती पाटील कोंढेकर, शमीम अब्दुला, महेश देशमुख, बालाजी चव्हाण, विठ्ठल पावडे, आनंद चव्हाण, अब्दुल गफार, मसूद खान, सतीश देशमुख तरोडेकर, माजी नगरसेवक स. शेरअली, महिला शहराध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम खान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अजीज कुरेशी, प्रवक्ता महंमद मुन्तजीब, जिल्हा कोषाध्यक्ष मुन्ना अब्बास, श्रीनिवास मोरे, शंकर शिंदे, अतूल पेदेवाड, प्रसेनजित वाघमारे, गणेश कोकाटे, अंबादास रातोळे, सुरेश हाटकर, सत्यपाल सावंत, डॉ. गंगाधर सोनकांबळे, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, संजय बेलके, अॅड. मसूद हुसैन, जावेद खान, महेश शिंदे, ज्योती कदम, गणेश ढगे, गोविंद बाबा गौंड, सुनिल वानखेडे, प्रतापराव देशमुख, मधुकर दिघे, तौफिक इनामदार, कैलास गोडसे, प्रल्हादराव सोळंके, सुभाष लोणे, बापूसाहेब पाटील, नसीम पठाण, जेसीका शिंदे, अनिल कांबळे, गगन यादव, अब्दल मुनीर, सय्यद शोएब, बाबू खोकेवाला, महंमद नासेर, लतीफ लोकवाला, दीपकसिंह हुजुरिया, संजय वाघमारे, शितल जोंधळे, संजय शर्मा, श्यामराव मनाठकर, डॉ. उत्तमराव इंगळे, गोविंद देशमुख, बाळासाहेब देशमुख अंबेगांवकर, रविंद्र दाठाळे, ललिता कुंभार, बालाजीसिंह ठाकूर, सरजितसिंह सुभाष काटकांबळे, ढिल्ले बाबाराव पांडागळे, तातेराव शिंदे, सुरज शिंदे आदींसह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments