दिल्ली : दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनात आज लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांची औपचारिक भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार केराम यांनी किनवट शहरालगतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास मार्गाबाबत सविस्तर चर्चा करून प्रकल्पाची गरज व स्थानिक नागरिकांना होणाऱ्या सोयींबाबत माहिती दिली.
तसेच त्यांनी श्रीक्षेत्र माहूरगड येथील श्री रेनुका माता मंदिर परिसरातील स्कायवॉक प्रकल्प हाही विषय मांडला. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यटन विकासासाठी या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी आमदार केराम यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे विशेष पाठपुरावा केला.
या वेळी आदिलाबादचे खासदार घोडाम नागेश, भाजप तेलंगाना प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोकराव मुस्तापुरे तसेच अनुसूचित जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक श्री. गोवर्धन मुंडे हे उपस्थित होते.
या बैठकीमुळे किनवट व माहूर परिसरातील पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आमदार भीमराव केराम यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक; किनवट बायपास व माहूर स्कायवॉक प्रकल्पासाठी पुढाकार
byLokaawaj
-
0
